लंडन – ब्रिटनला तडाखा दिलेल्या सर्वात भीषण वादळात गणना झालेल्या सेंट जूड वादळामुळे आत्तापर्यंत चार जण मृत्युमुखी पडले आहेत तर ६ लाखांहून अधिक घरे अंधारात बुडाली आहेत. जगातील सर्वात गर्दीचा समजला जाणार्या हिथ्रो विमानतळावरही वादळामुळे १३० उड्डाणे रद्द केली गेली आहेत असे समजते.
दक्षिण ब्रिटनच्या वेल्स भागाला वादळाचा सर्वाधित तडाखा बसला असून तेथे १६० किमीच्या वेगाने वारे वाहात आहेत. त्यामुळे या भागाला हवामान विभागाकडून तब्बल १५२ वेळा पुराच्या धोक्याचा इशारा दिला गेला असल्याचे समजते.रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच रस्त्यांवर झाडे पडल्याने व विजेचे खांब पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वादळग्रस्त भागात मदतकार्य पूर्ण क्षमतेने सुरू असून फ्रान्सलाही या वादळाचा तडाखा बसला आहे.
पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी अधिकार्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतल्याचेही सांगितले जात आहे.वादळामुळे झालेल्या नुकसानीचा नक्की आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मार्च २००८ मध्येही ब्रिटनला असाच वादळाचा तडाखा बसला होता.