महिलांच्या आयुष्यामध्ये मातृत्व ही एक सुंदर गोष्ट असते. परंतु ती जितकी सुंदर असते तितकीच कष्टप्रद असते. नैसर्गिक रितीने मुलाला जन्म देताना महिलांना एवढ्या प्रसूती वेदना सहन कराव्या लागतात आणि तिच्या आयुष्यातली ती एवढी कठीण गोष्ट असते की, प्रसूती म्हणजे महिलेचा पुनर्जन्म असतो असे म्हणतात. त्यावर वैद्यकीय शास्त्राने सिझेरियन सेक्शन ही शस्त्रक्रिया शोधून काढली आहे.
तिच्यामुळे प्रसूती वेदना टळतात आणि महिला सुद्धा सिझेरियनचाच आग्रह धरतात. डॉक्टर तर तसा आग्रह अन्य काही कारणांनी धरतच असतात. परंतु सिझेरियन नंतर अनेक गुंतागुंती निर्माण होत असतात. म्हणून वडिलधारी मंडळी नैसर्गिक-रित्या प्रसूती होणे पसंत करत असतात. या दोन गोष्टींच्या संघर्षात पुण्याच्या कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या मेडिकल सर्व्हिसेस विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती शहा यांनी एक मध्यममार्ग शोधून काढला आहे.
त्यांनी प्रसूती वेदना सहन कराव्या न लागता नैसर्गिक प्रसूती कशी होईल, यावर संशोधन केले असून त्यावर सध्या ङ्गार चर्चा होत आहे. त्या पद्धतीला एपीज्युरल अनेस्थेशिया असे नाव देण्यात आलेले आहे. ज्यामुळे नैसर्गिक प्रसूती होते, परंतु ती वेदनारहीत असते. आपण माता होण्यास उत्सुक असलेल्या नवविवाहितांचा कानोसा घेतला तर असे लक्षात येईल की, या नव्या पद्धतीमुळे या तरुणींना मोठाच दिलासा मिळालेला आहे. परंतु पद्धत नवीन असल्यामुळे माता होण्यास उत्सुक असलेली तरुणी आणि तिचा पती, सासू-सासरे, माता-पिता अशा सर्वांच्या मनामध्ये या पद्धती विषयी अनेक शंका आहेत. त्यामुळे डॉ. ज्योती शहा आपल्याकडे अशा प्रसूतीसाठी दाखल होणार्या महिला आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी समुपदेशनाचे सत्र आयोजित करतात आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या शंकांना समर्पक उत्तरे देतात. त्यांचे गैरसमज दूर करतात.
या पद्धतीच्या प्रसूतीची तशी तयारी गर्भसंभवापासूनच झालेली असते. त्यामुळे तशी चाहूल लागताच नवविवाहित महिलांनी रुग्णालयाशी संपर्क साधावा लागतो आणि डॉ. ज्योती शहा त्यांची ती सुलभ प्रसूती अधिक सुलभ व्हावी या दृष्टीने अनेक सूचना देतात. प्रसूतीनंतर सुद्धा या प्रकारात काही दक्षता बाळगाव्या लागतात. सिझेरियन झाल्यानंतर नॉर्मल अवस्थेत यायला बरेच दिवस लागतात. पण या पद्धतीत एवढे दिवस लागत नाहीत.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही