न्यूयॉर्क- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व परिणामकारकरीत्या करू शकणार नाहीत, असे मत अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्सफ या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागाने शनिवारी व्यक्त केले. मोदी देशातील जनतेच्या मनात भीती व तिरस्काराची भावना वाढवू शकतात, त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या नेतृत्वाची अपेक्षा करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
देशातील विरोधी पक्षांसोबत तीव्र मतभेद असल्याने त्यांच्यासोबत काम करण्याची क्षमता मोदींमध्ये नाही. भारतात विविध धर्माचे नागरिक राहतात. मात्र जातीय तेढ निर्माण करून मोदी त्यांच्या मनात भीती घालू शकतात. 2002मध्ये गुजरात येथे झालेल्या जातीय हिंसाचारात एक हजार निरपराध नागरिक मारले गेले होते. या घटनेचा दाखला देत टाइम्सने मोदींना चांगलेच फटकारले. गुजरातमध्ये विकास झाल्याच्या मोदींच्या दाव्यावरही संपादकीय विभागाने प्रश्नचिन्ह उभे केले.