
मुंबई – नृत्याची आवड आहे, नृत्य शिकायचे आहे पण प्रत्यक्ष क्लास मध्ये जायला वेळ नाही अशी अनेकांची समस्या असू शकते. पण आता डान्स तुम्हाला घरबसल्या अथवा तुम्ही असाल तेथे, तुम्हाला हव्या त्या वेळात शिकता येणार असेल व तो खुद्द माधुरी दीक्षितकडून शिकता येणार असेल तर? ही संधी आपली डान्समास्टर माधुरी दीक्षित नेने हिने आपल्या शिष्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे डान्स वुइथ माधुरी या अॅपच्या सहाय्याने. आयओएस व अॅड्रईड ऑपरेटिग सिस्टीम असलेल्या कोणत्याही मोबाईल हँडसेट व टॅब्लेटवर हे अॅप उपलब्ध आहे.
