
काठमांडू – रविवारी माऊंट एव्हरेस्टवरून यशस्वी स्काय डायव्हिंग करणारी पहिली व्यक्ती बनण्याचा मान बहुविकलांग असलेल्या फ्रान्सच्या ५५ वर्षीय मार्क कोप याने रविवारी मिळविला आहे. गेली दहा वर्षे मेंदूच्या असाध्य रोगामुळे चालणे व बोलणे अशक्य झालेल्या, पाठीचा कणा अतिशय नाजूक अवस्थेत असलेल्या आणि स्नायू कमजोर असलेल्या कोप यांनी हेलिकॉप्टरमधून १० हजार मीटर म्हणजे ३२८०० फुटांवरून त्यांचा स्काय डायव्हर मित्र मारियो याच्यासह एव्हरेस्टवरून आकाशात उडी घेतली आणि जमिनीवर यशस्वी लँडींगही केले. त्यानंतर त्यांना कांही इजा झाली नाही ना हे पाहण्यासाठी काठमांडू मधील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
