बगदाद – इराकच्या उत्तर भागातल्या एका शहरामध्ये कार बॉम्बच्या स्ङ्गोटांची मालिका होऊन ६२ लोक ठार झाले. गेल्या महिनाभरामध्ये इराकला पुन्हा एकदा शक्तीशाली बॉम्बस्ङ्गोटांचे धक्के बसत आहेत. एप्रिल महिन्यापासून इराकच्या विविध भागात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये पाच हजार लोक मारले गेले आहेत. कोणत्याही ठिकाणी स्फोट झाला की, त्या स्ङ्गोटाची जबाबदारी अल कायदा ही संघटना घेते. परंतु कालच्या स्फोटाची जबाबदारी अजून तरी अल कायदाने घेतलेली नाही.
गेल्या महिनाभरातला हा सर्वाधिक विनाशकारी बॉम्बस्ङ्गोट समजला जात आहे. ५ ऑक्टोबर रोजी अशाच स्ङ्गोटांच्या मालिकेत ७५ लोक मारले गेले होते. काल स्ङ्गोट झालेले ठिकाण शहरातील श्रीमंत वस्तीतील कार पार्किंग हे होते. पोलिसांची नजर चुकवून अर्ध्या तासाच्या काळात या पार्किंगमधील दोन मोटारींमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले. या स्ङ्गोटाव्यतिरिक्त नार्व्हान, माशताल, बलादियात या शहरांतूनही बॉम्बस्ङ्गोटाच्या घटना घडल्या आहेत.
ुउत्तर भागातील मोसूल या शहरामध्ये कारबॉम्बने भरलेली एक मोटारकार तिच्या ड्रायव्हरने गर्दीमध्ये घुसवली आणि तिचा स्ङ्गोट घडवला. या स्ङ्गोटात या ड्रायव्हरसह १४ जण ठार झाले. काल इराणच्या विविध भागांमध्ये सहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. इराकी जनतेचे जनजीवन या प्रचंड हिंसाचारामुळे विस्कळीत झाले आहे.