पाटणा स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन

पाटणा – पाटण्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय असून या संघटनेच्या स्लीपर सेलमधील दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी इम्तियाज या तरुणाला झारखंडातील रांचीजवळच्या धुर्वा या गावाजवळ अटक करून त्याच्याजवळून अडीच किलो वजनाची स्फोटके जप्त करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी बिहारमधील बोधगया येथे झालेल्या स्फोटांची पद्धती आणि पाटण्यातील पद्धती सारखीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक झालेल्या दुसर्‍या तरुणाचे नाव तेहसीन असे असून तो यासीन भटकलचा निकटवर्ती असल्याचे समजते. त्याचे नाव हसन ऊर्ङ्ग मोनू असेही सांगितले जाते आणि त्यानेच पाटण्यात स्ङ्गोट करण्यासाठी वापरलेले बॉम्ब तयार केले आहेत.

तेहसीन हा बिहारच्या समस्तीपूरचा राहणारा असून हैदराबादेत झालेल्या स्ङ्गोटांमागे त्याचाच हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या व्यतिरिक्त त्याने नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळूर याही ठिकाणच्या स्ङ्गोटांमध्ये सहभाग घेतला असावा असा संशय आहे. काल इम्तियाज याला अटक केल्यानंतर त्याचा जबाब नोंदला तेव्हा त्याने पाटण्यात स्ङ्गोट केल्याचे कबूल केलेच, पण आपल्याबरोबर या कामात तेहसीन हाही सहभागी होता असे सांगितले. त्यामुळे तेहसीनला अटक करण्यात आली. तेहसीनचा संबंध यासीन भटकल याच्याशी असल्यामुळे पाटण्याच्या स्ङ्गोटामागे भटकलच्या इंडियन मुजाहिदीन या संघटनेचाच हात असावा असा संशय बळावला आहे.