लघुपटात विविध प्रयोग करण्याची गरज – उमेश कुलकर्णी

पुणे, -शहरात भरणार्‍या विविध लघुपटमहोत्सवांद्वारे जागतिक पातळीवरील लघुपट पाहण्याची संधी इथल्या तरूणाईला मिळत आहे. लघुपट यामाध्यमाचा सजगपणे विचार करून त्यामध्ये वैविध्यपुर्ण प्रयोग करण्याची गरज आहे. असेमत प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी शनिवारी व्यक्त केले.

मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने आयोजित तिसर्‍या पुणे लघुपटमहोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.े. यावेळी उद्योजक अविनाशमोेहिते, कार्यकारी निर्माते पद्माकर नष्टे, भालचंद्र सुपेकर उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, लघुपट हे माध्यम सोपे वाटत असले तरीही ते अतिशय आव्हानात्मक आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे लघुपट करण्यामध्ये सुलभता आली. परंतु त्याचा उपयोग कलाकृती पटकन करण्यासासाठी होऊ नये. जगाच्या विविध भागांमधील लोकांनी बनविलेले लघुपट कसे आहेत. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रयोग केले आहेत, या सार्‍या गोष्टी प्रेक्षकांना यामहोत्सवाद्वारे शिकायला मिळतील. राष्ट्रीय चित्रपट संग‘ाहलयात येत्या बुधवारपर्यंत पर्यंत सुरू असलेल्या यामहोत्सवात 22 देशांतील 131 लघुपट दाखविण्यात येणार आहेत.