मी मुंबईकरच आहे- अमिताभ

‘मी मुंबईकर आहे, या शहरानं मला सर्व काही दिलं, या शहराचा मी ऋणी आहे `, अशा भावना बिग बी अमिताभ यांनी व्यक्त केल्या.` गेल्या काही दिवसांपासून मी मराठी भाषा शिकतो आहे. मराठीवर प्रभुत्व मिळवण्याचा माझा प्रयत्न असून पुढच्या कार्यक्रमात मी मराठीतूनच बोलेन`, असेही यावेळी बोलताना बिग बी अमिताभने स्पष्ट केले.

‘ह्रदयेश आर्ट्स’तर्फे बीग बी अमिताभ बच्चन यांचा ७१ वा वाढदिवस आणि लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीला ७१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा अनोखा योग यंदा जुळून आणला होता. त्या्निमित्ताने पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त ‘ह्रदयेश आर्ट्स’तर्फे अमिताभ बच्चन यांचा विशेष गौरव करण्यात आला.

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता. मात्र तब्येत खराब असल्याने लतादीदी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते हा पुरस्कार महानायकाला देण्यात आला.