एड्सपेक्षाही घातक व्हायरस

सार्‍या जगामध्येच गेल्या ३५ वर्षात एड्सने किती धुमाकूळ घातला आहे. हे आपण जाणतोच. परंतु आता त्यापेक्षाही भयानक आणि कसल्याही औषधाला दाद न देणारा गोनोरिया सुपरबग हा व्हायरस काही लोकांच्या शरीरात सापडलेला आहे आणि त्यामुळे लैंगिक संबंधातून संक्रमित होणार्‍या या रोगाच्या बाबतीत वैद्यकीय तज्ञांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. पूर्वीच्या काळी लैंगिक संबंधातून पसरणारा गोनोरिया हा गुप्तरोग लोकांना माहीत होता. त्याची बाधा होणार्‍या लोकांची संख्याही चांगलीच होती. मात्र त्यावेळी होणारा गोनोरिया रोग हा असाध्य नव्हता. काही औषधांनी तो दुरुस्त होत असे.

विशेषतः ऍन्टिबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकांनी तो ताळ्यावर येत असे. परंतु आता सापडलेला गोनोरिया हा विकार औषधांना दाद न देणारा आहे आणि त्यामुळे अनैतिक संबंध किंवा एकाच वेळी अनेकांशी संबंध ठेवणारे स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने मरायला लागतील असा इशारा या तज्ञांनी दिलेला आहे. या नव्या असाध्य रोगाचे जंतू दोन वर्षापूर्वी जपानमधल्या एका कॉलगर्लच्या शरीरात सापडले आहेत. २००९ साली सापडलेल्या या नव्या सुपरबगचे नाव शास्त्रज्ञांनी एचओ ४१ असे ठेवले आहे. तो एड्सपेक्षा अधिक आक्रमक आहे आणि तो एड्सपेक्षा अधिक वेगाने पसरणारा आहे. आतापर्यंत जगामध्ये एड्समुळे ३ कोटी लोक मरण पावले असावेत असा अंदाज आहे.

मात्र या नव्या गोनोरियामुळे त्यापेक्षा अधिक लोक जीवाला मुकतील असा तज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकेतील निसर्गोपचार करणारे डॉ. ऍलन ख्रिस्टियनसन यांनी गोनोरियाच्या भीषण परिणामांची जाणीव करून दिली आहे. एड्स झालेला रुग्ण काही वर्षे जगू शकतो आणि त्याला सुखाचे जीवन जगता यावे एवढी औषधे आता उपलब्ध झाली आहेत. परंतु नव्या गोनोरियामुळे रुग्णाचा मृत्यू त्यापेक्षा लवकर ओढवतो. त्यामुळे या रोगाच्या जंतूंचा शोध हा मानवी जातीला मिळालेला मोठा इशारा मिळालेला आहे. त्यापासून धडा घेऊन तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या १०-१५ वर्षात अनेक लोक गोनोरियाने पटापट मरताना दिसतील.

गोनोरियाच्या प्रसाराचा वेग मोठा आहे आणि एक बाधित व्यक्ती कमीतकमी २० जणांना प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही. तेव्हा सावधान.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment