प्रियंका चोप्रा झाली पुणेकर

पुणे – माजी मिस वर्ल्ड व बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही पुण्याच्या इतकी प्रेमात पडली आहे की तिने येथे घर खरेदी करून पुणेकर होणे पसंत केले आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यातील शांतता, प्रसन्नता आणि मस्त हवेची प्रियंका दिवानी बनली आहे.

एका फोटो शूट दरम्यान बोलताना ती म्हणाली की पुण्यात घर घेतले आहे आणि ते मला खूप सुंदर सजवायचेही आहे. माझ्या घरात खूप पुस्तके, कपडे, म्युझिक सीडी असतील व घराच्या भिंतीवर रंगीत सितारे असतील. मुंबईत आल्यावर चार वर्षांनंतर पहिले घर घेतले असे सांगताना पुण्यात नक्की कोठे घर खरेदी झाली याचा पत्ता मात्र प्रियंकाने लागू दिलेला नाही.