
लंडन – ब्रिटन साम्र्राज्याचा भावी राजा गुबगुबीत, गोड प्रिन्स जॉर्ज याचा ख्रिश्चन धर्मानुसार केला जाणारा बाप्तिस्मा विधी बुधवारी राजघराण्याच्या सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल चॅपलमध्ये पार पडला. या निमित्ताने राजघराण्यातील चौथ्या पिढीचा बाप्तिस्मा करण्याची संधी आर्चबिशप ऑफ केंटरबरी रेव्हरंड जस्टीन वेल्बी यांना मिळाली. जॉर्जचा बाप्तिस्मा जॉर्डन नदीचे पाणी त्याच्या डोक्यावरून घालून करण्यात आला. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा करताना जॉर्हन नदीचे पाणी वापरले गेले होते असा समज आहे. व यामुळे राजघराण्यातील व्यक्तींचा बाप्तिस्मा करताना जॉर्डन नदीचे पाणी आणले जाते .या समारंभाला अगदी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. राणी एलिझाबेथ, प्रिन्स फिलिप्स, बाळाचे आईवडील व आईच्या माहेरच्या चार व्यक्ती या समारंभाला उपस्थित होत्या. त्यानंतर आजोबा प्रिन्स चार्लस यांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम झाला.
