चेन्नई – तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागाला सोमवार (दि. २१ ऑक्टोबर) आणि मंगळवार असे दोन दिवस मुसळधार पावसाचा ङ्गटका बसला. चेन्नई शहराच्या लगतच्या भागात या पावसामुळे सखल भागातल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने या वस्त्यातील लोकांना स्थलांतरित करावे लागले. असाच प्रकार आंध्र प्रदेशातही घडला आहे.
या दोन दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पडणारा पाऊस हा ईशान्य मोसमी वार्यांमुळे पडत आहे. गेल्या ४८ तासांपासून या दोन्ही राज्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे. बंगाल उपसागराच्या पश्चिम भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेशाच्या रायलसीमा भागातील कडपा जिल्ह्यात तुङ्गान पाऊस पडत आहे. याच भागातल्या नेल्लोर जिल्ह्यात २४ तासात दीड इंच पाऊस पडला.
विशाखापट्टणम् शहरातही पावसाने हा:हाकार माजला आहे. या समुद्र किनार्यावर आगामी २४ तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चित्तूर, कृष्णा, गुंटूर आणि पूर्व गोदावरी या जिल्ह्यांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
तेलंगणाच्या नलगोंडा, खम्मम, रंगारेड्डी, महिबूबनगर आणि हैदराबाद या शहरांमध्ये आगामी ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळ आणि पुडुचेरी या राज्यांच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ४५ ते ५५ कि.मी. वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.