मोदी पंतप्रधान झाले तर आखातातून इंधन बंद होण्याचा धोका- आंबेडकर

नागपूर – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भाजपा सोडून सर्वांचा विरोध आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुस्लिमाना गोळा करण्यासाठी राजकीय नेते कोणतेही आगळे वेगळे तर्क लावत आहेत. रिपब्लिकन बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर चक्क नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशात तेलाची टंचाई निर्माण होईल, असा नवा शोध लावला आहे.

देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीसारख्या जातीयवादी नेत्याकडे असताना इराणसारखे मुस्लिम देश भारताला पेट्रोलियम पदार्थ देणार नाहीत, असं प्रकाश आंबेडकर यांना वाटतं. नागपुरात महाराष्ट्र लोकशाही आघाडी या चौथ्या मोर्च्याच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं. राज्यातील छोट्या छोट्या 24 संघटनांनी एकत्रित येत या आघाडीची स्थापना केली आहे.

भाजप नेते जरी राज्यात 72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करत असले आणि त्याचे पुरावे देत असले तरी या घोटाळ्यात एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही असा दावा भाजप नेते करू शकतात का असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी केला.