मेलबर्न – ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यात भडकत असलेल्या ५६ बुशफायर किवा वणव्यांमुळे या राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जागोजाग धुमसत असलेल्या या ५६ वणव्यांपैकी १२ वणवे हे नियंत्रणाबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

अग्नीशमन दलाच्या अधिकार्यांगनी हे वणवे हजारो किमी परिसरात पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. ब्ल्यू माऊंटन परिसरातील लिथगो, स्पिंगवूड व माऊंट व्हिकटोरिया भागातील वणवे अतिशय काळजी करण्यासारख्या अवस्थेत असून स्टेट माईन येथे पेटलेला वणवा माउंट व्हिक्टोरिया येथील वणव्याला जाऊन भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आत्तापर्यंत या वणव्यात ४० हजार हेक्टर जमिनीवरील वनसंपदा व मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
अग्नीशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रात्रंदिवस सुरू आहेत मात्र हवामान विभागाने वर्तविल्याप्रमाणे उष्ण व वेगवान वार्यांमुळे ही आग थोपविणे अशक्य बनले असल्याचे अधिकारी सांगतात. या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे मात्र आता आणीबाणी जाहीर झाल्याने जागा सोडण्यास नकार देणार्या लोकांना येथून जबरदस्तीने हलविण्याचे तसेच गरज पडल्यास वीज व गॅस पुरवठा तोडण्याचे अधिकार प्रशासनाला मिळाले आहेत. हे अधिकार पुढचे तीस दिवस प्रशासनाकडे राहणार आहेत. येथील नागरिकांवर आपली मालमत्ता अथवा आपले जीवन यापैकी कांही तरी एक निवडण्याची दुर्देवी वेळ आली असल्याचे प्रशासन अधिकार्यांचे म्हणणे आहे.