शोभन सरकारचा नरेंद्र मोदीना सवाल

नवी दिल्लील- उन्नावमधील या खजिन्याचा पत्ता सांगणारे संत शोभन बाबा यांनी गुजरातचे मुख्यीमंत्री नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून त्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी संत शोभन बाबा यांना पडलेल्या स्वपनाची खिल़्ली उडवली होती. त्यामुळे दोघांतील वाद आता चांगलाच रंगतोय असे दिसत आहेत.

काही दिवसापूर्वी चेन्नईतील सभेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणात उन्नावमध्ये सुरू असलेल्या खोदकामावर कडाडून टीका केली होती. कोणा एका बाबाला स्वप्न पडले आणि त्याने कुठेतरी सोने लपवल्याची माहिती सरकारला दिली. त्यानंतर सरकारने खोदकाम सुरू केले. सरकारच्या या कृतीमुळे देशभरात आपण हास्यास्पद ठरलो आहोत. सगळे जग आपल्याकडे बघून हसत आहे. सरकारला खरोखरच काहीतरी भरीव करायचे असेल तर भ्रष्टाचा-यांनी परदेशात लपवलेला काळा पैसा आधी परत आणावा, त्यानंतर अशी सोन्यासाठी खोदाई करण्याची वेळच येणार नाही, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते.

त्यावर उन्नावमधील या खजिन्याचा पत्ता सांगणारे संत शोभन बाबा यांनी नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून त्यांचा समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि टीम भाजप यांना केंद्रावर आणि सोनियांवर टीका करण्यासाठी तुम्ही संत परंपरेचा अपमान केला आहे. आपल्यासारख्या प्रभावी नेत्याने चुकीचा प्रचार करून देशाचा वेळ वाया घालवू नये, असे प्रश्न संत शोभन सरकारांनी विचारले आहेत.