श्रीकाकुलम् – आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी वादळग्रस्त श्रीकाकुलम् शहराला भेट देऊन तिथे झालेल्या हानीची पाहणी केली आणि नंतर झालेल्या सभेत नुकत्याच येऊन गेलेल्या ङ्गायलीन वादळाची तुलना तेलंगण निर्मितीवरून निर्माण झालेल्या असंतोषाशी केली. ङ्गायलीन वादळ शमले तसे तेलंगण निर्मितीचे हे वादळ सुद्धा आपण शमवू आणि आंध्र प्रदेशाचे विभाजन मागे घ्यायला लावू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस पक्षाने तेलंगण निर्मितीचा निर्णय घेतलेला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत तसा ठराव मंजूर झाला आहे. परंतु कॉंग्रेस पक्षाचेच असलेले मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी हे पक्षाच्या आणि आपल्या पक्षाच्या केंद्र सरकारच्या भूमिकेशी विरोधी भूमिका मांडत आहेत. त्यांनी आजवर पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समोर आपला विरोध प्रकट केला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. कॉंग्रेसचे नेते विभाजनाच्या निर्णयावर ठाम आहेत.
किरणकुमार रेड्डी हे पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात असले तरी त्यांनी आजपर्यंत आपला विरोध जाहीरपणे प्रकट केला नव्हता. तो काल श्रीकाकुलम् येथे पहिल्यांदाच व्यक्त केला. त्यामुळे आंध्र प्रदेशाच्या राजकारणात आता खर्या अर्थाने राजकीय ङ्गायलीन वादळ घोंगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.