लंडन – समाजाकडून वारंवार होणा-या टिकेकडे दुर्लक्ष करून ब्रिटनमधील सुप्रसिद्ध वॉरविक विद्यापीठातील रोर्इंग सोसायटीच्या विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा विवस्त्र दिनदर्शिका (न्यूड कॅलेंडर) सादर केले आहे. मात्र याप्रकारे विधायक काम करू नये, असाच प्रवाह इंग्लंडमधून उमटत आहे. विशेष म्हणजे या दिनदर्शिकेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम मॅकमिलन कॅन्सर सोसायटीला मदतीच्या रुपात दिली जाणार आहे.
डेली मेल’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यापूर्वी 2012 मध्ये या विद्यार्थिनींनी सेमी न्यूड कॅलेंडर सादर केले होते. तेव्हा त्यांना समाजाकडून शिव्याशाप मिळाला होता. यंदा मात्र रोर्इंग सोसायटीच्या 17 विद्यार्थिनींनी पूर्ण विवस्त्र होऊन टीका करणा-यांविरुद्ध दंड थोपटले आहेत.न्यूड कॅलेंडरची कल्पना इतिहासाच्या तीन विद्यार्थिनींच्या डोक्यातून बाहेर आली आहे. हॅटी रीड (21), सलाजानो (21) आणि सेफिया बेल (19) असे या विद्यार्थिनींची नावे आहेत.