मुंबई – पैसा, प्रसिद्धी, मान भरपूर मिळाल्याची भावना होत असून ज्या समाज्यात आपण राहतो. त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो. याचसाठी कमाईतील काही भाग देण्याची इच्छा असल्याचे मत अभिनेता सलमान खानने एका मुलाखतीत व्यक्त केले. त्याच्या या वक्तव्यामुळे सलमानला आता नको पैसा हवी समाजसेवेची उपरती झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
2009 मध्ये बिइंग ह्यूमन’ ही संस्था स्थापन केली. या माध्यमातून कपड्यांची विक्री करण्यात येते.मुंबई, अहमदाबाद आणि लुधियाना येथे संस्थेचे शोरूम आहेत. या दुकानातील नफ्यातील ठराविक रक्कम वृद्धाश्रम, सामाजिक संस्था आणि गोरगरिबांसाठी देण्यात येतो. भविष्यात त्यांच्यासाठी हॉटेल्स आणि रुग्णालये सुरू करण्याचा विचार आहे. यातून मिळणारे उत्पन्न समाजासाठी खर्च करण्याची इच्छा असल्याचे सलमान म्हणाला. या संस्थेने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी शेकडो पाण्याच्या टाक्या पाठवल्या होत्या. बिइंग ह्यूमन’ ही संस्था अनेकांना मदत करण्यासोबतच बॉलीवूडमधील कामगार, तंत्रज्ञ यांना मदत करते. त्यामुळे या संस्थेचे नाव मनोरंजन क्षेत्रात आदराने घेतले जाते.