इस्त्रोकडून नवीन वर्षातल्या पहिल्या सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे ५.५९ मिनिटांनी या वर्षातील पहिल्या रडार इमेजिंग सॅटेलाईट ईओएस -०४ चे आंध्रप्रदेश मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले. हा सॅटेलाईट अन्य दोन छोट्या सॅटेलाईट समवेत पीएसएलव्हीच्या मदतीने लाँच केला गेला. हा सॅटेलाईट पृथ्वीचे अचूक फोटो पाठवू शकणार आहे. ईओएस -०४ चे वजन १७१० किलो असून पीएसएलव्ही – सी २ च्या सहाय्याने सूर्याच्या ध्रुवीय कक्षेत ग्रहापासून ५२९ किमी अंतरावर तो स्थिर केला जात आहे.

ईओएस ०४ सोबत एका विद्यार्थ्याचा इन्स्पायर सॅट नावाचा उपग्रह आणि इनसॅट २ डीटी हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला गेला. पैकी दुसरा उपग्रह भूतान आणि भारत यांचा संयुक्त उपग्रह आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, कोणत्याही हवामानात पृथ्वीचे उच्च गुणवत्तेचे फोटो, पूर, माती वाहून जाणे, जंगल, शेती, हिरवाई यांचे अचूक मॅपिंग या उपग्रहाच्या मदतीने करता येणार आहे. गेल्या १० वर्षातले पीएसएलव्ही तर्फे हे ५४ वे उड्डाण आहे असे सांगितले जात आहे.