अमेरिकेच्या त्या’ जहाजावरील 33 कर्मचारी अटकेत

टूटिकोरिन- भारताच्या हद्दीत परवानगीशिवाय प्रवेश केलेल्या अमेरिकेतील एका खासगी कंपनीच्या जहाजावरील 33 कर्मचा-यांना तमिळनाडू पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून बेकायदा ठेवलेली शस्त्रास्त्रे व स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. एम व्ही सिमन गार्ड ओहिओ’या जहाजावरील 35 बंदुका आणि 5 हजार 680 काडतुसे सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतली. भारतीय हद्दीत संशयास्पदरित्या आढळलेले हे जहाज 12 ऑक्टोबर रोजी जप्त केले होते.

या जहाजावरील 35 पैकी 33 कर्मचा-यांना मुथिहापुरम पोलिस ठाण्यात अटकेच्या चौकशीसाठी हजर करण्यात आले. दोन कर्मचा-यांकडे या जहाजावरील दुरुस्तीसाठी जहाजावर रहाण्याची कागदपत्रे आढळली असली तरी त्यांनाही अटक केली आहे. 1500 लीटर डिझेल घेऊन अवैध मार्गाने गेल्याप्रकरणी या कर्मचा-यांविरोधात 14 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापूर्वी 13 ऑक्टोबर रोजी थरुवैकुलम सागरी पोलिस ठाण्यात नौसेनेच्या सहाय्यक कमांडंट अधिका-यांनी तक्रार दाखल केली आहे.