दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार निश्चित नाही – गडकरी

नवी दिल्ली – दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार अजून निश्चित झालेला नसून याबाबत भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे भाजप नेते नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले. दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या उमेदवारावरुन मतभेद होते.

विजय गोयल यांनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केल्याने या बाबतच्या चर्चेला उधाण आले होते. परंतु गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीतच निर्णय होणार असे म्हटल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.