अभिनेता अक्षय कुमारचा १९९२ साली आलेला ‘खिलाडी’ सिनेमा सर्वांना माहितीच असेल. या सिनेमामुळे एकाच रात्रीतून अभिनेता अक्षय कुमारला स्टार बनवले. थ्रिलर असणा-या या सिनेमातील गाणी चांगलीच गाजली होती. आता २१ वर्षांनी या सिनेमाचा पुढील सिक्वेल येत आहे. त्यामध्ये अक्षयकुमार काम करणार की नाही याबाबत मात्र अनिश्चातता आहे.
१९९२ साली अब्बास-मस्तान या जोडगोळीने दिग्दर्शित केलेला ‘खिलाडी’ सिनेमा सुपरहिट झाला होता. अक्षय कुमारची या सिनेमात महत्वाची भूमिका होती. अक्षय कुमारचे नाव या सिनेमापासून ‘खिलाडी कुमार’ असे काही जणांनी ठेवले होते. अक्षयसोबत या सिनेमात दीपक तिजोरी, आयेशा झुल्का हे कलाकारही झळकले होते.
आता २१ वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेूल तयार करताना, यामध्ये अक्षय कुमार पाहायला मिळणार की नाही हे अजून तरी अनिश्चीात आहे. ‘खिलाडी’ सिनेमा तरूण पीढीला नक्कीच आठवत असेल. त्यामुळे या सिनेमाचा पुढचा भाग पाहताना प्रेक्षकांचा गोंधळ होणार नाही, अशी सिनेमाच्या निर्मात्यांना खात्री आहे. मात्र ‘खिलाडी’ सिनेमाच्या पुढील भागात त्याऐवजी कदाचित नवे कलाकारही पाहायला मिळू शकतील. हा ‘खिलाडी’ सिनेमा पाहायला प्रेक्षकाना आवडेल का हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजेल.