गोवा – गोवा पर्यटन मंत्रालय दक्षिण गोव्यातील लोकप्रिय समुद्र किनार्यांच्या विकासासाठी १७ कोटी २३ लाख रूपये खर्च करणार असून त्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून निधी पुरविला जाणार आहे असे गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परूळेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमांतर्गत कोलवा, गोमसुआ, बेतलबातीम, बनोलिम हे लोकप्रिय किनारे विकसित केले जाणार आहेत. या किनार्याववर वर्षभर देशी परदेशी पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी राहण्यासाठी जादा सुविधा, जादा जागा, स्वच्छतागृहे, वाहन तळ सुविधा, चिल्ड्रेन पार्क, प्ले एरिया अशा सुविधा अधिक प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असेही परूळेकर म्हणाले.