वॉशिग्टन – शटडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अमेरिकेची डिफॉल्टर होण्याकडे वेगाने वाटचाल सुरू झाली असून अमेरिकेला या संकटातून वाचविण्यासाठी अध्यक्षओबामा यांच्या हातात आता केवळ तीन दिवसांचा वेळ राहिला आहे.

अमेरिकेत गेले १५ दिवस शटडाऊन सुरू असल्याने ८ लाख सरकारी कर्मचार्याना सुट्टीवर पाठविले गेले आहे. हेल्थ केअर बिल मंजुरीवरून चाललेल्या वादात अमेरिकेचे नव्या वर्षाचे आर्थिक बजेट अडकले आहे. अमेरिकेला १७ आक्टोबरपूर्वी कर्ज घेण्याची सीमा वाढवून घेणे कर्मप्राप्त आहे. याचाच दुसरा अर्थ असा की अध्यक्ष ओबामा यांच्या हातात आता केवळ गुरूवारपर्यंतचा वेळ राहिला आहे. या कालात ही कर्जवाढ करून घेता आली नाही तर अमेरिका अघोषित स्वरूपात दिवाळखोर बनेल असे सांगितले जात आहे.
हेल्थ केअर संबंधात वाढविलेले बजेट पास करण्यासाठी ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वेळ वाढविण्यात आली होती मात्र हे बजेट पास होऊ शकले नाही. त्यानंतर १ आक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन सुरू झाला. त्यात लाखो कर्मचार्यांधना सुट्टीवर पाठविण्याबरोबरच कार्यालये, म्यझियम व नॅशनल पार्कही बंद केली गेली आहेत.