मुंबई- मनसेची स्थापना मराठी माणसांची टाळकी फोडण्यासाठी नाही, तर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणा-यांना ठोकण्यासाठी केली आहे, असे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबतच्या संभाव्य संघर्षाला बगल दिली. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे हे शिवसेनेबाबत सॉफट कार्नर घेणार असे दिसत आहे.
मनसचे गटनेते तथा आमदार बाळा नांदगावकर यांनी आपल्या मतदारसंघात प्रस्तावित केलेल्या १४ विकासकामांचे भूमिपूजन दस-याच्या मुहुर्तावर राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यापैकी नरे पार्कमध्ये उभ्या राहणा-या क्रीडा संकुलाला शिवसैनिकांनी विरोध केल्याने वादंग उठला होता. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी हे वक्तव्य केले. त्यांमुळे आगामी काळात शिवसेना व मनसेत हाणामरारी होणार नाही हे आता स्पाष्ट झाले आहे.
यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, या ठिकाणी जर नागरिकांना हवे असेल तर नरे पार्कात नक्की क्रीडा संकूल होईल आणि जर नको असेल तर, होणार नाही, इथे जर स्विमिंग पूल झाला तर स्थानिक तरुण-तरुणींना त्याचा आनंद घेता येईल. पण बाहेरचे आले तर त्यांना उचलून फेका