बॉलीवूडचे सिनेमे कौटूंबिक असतात- शाहरूख

बॉलीवूडच्या सिनेमाला कौटूंबिक पार्श्वभूमी असते. त्यामुळे अशा स्वरूपाचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवडतात. या सिनेमात कौंटूबिक भावना देखील असते. त्यामुळेच हे सिनेमे हिट होतात, असे मत अभिनेता शाहरूख खान यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना अभिनेता शाहरूख खान म्हणाला, ‘बॉलीवूडच्या काही सिनेमात गंभीर स्वरूपाचा अभिनय करावा लागतो. त्यासोबतच मनोरंजनासाठी नृत्य सादर करण्यात येते. त्यामुळेच काही सिनेमात अभिनय करताना कलाकारांना संघर्ष करावा लागतो. सिनेमा जर यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी आपल्यााकडे क्षमता असण्याची गरज आहे.’

आतापर्यंत सिनेमात सर्व प्रकारची भूमिका अभिनेता शाहरूखने केली आहे. प्रत्येक सिनेमा यशस्वी व्हावा याकरीता कलाकारला परिश्रम घ्यावे लागतात. त्या मुळेच सर्व कलाकार मिळून एकत्रित काम करीत असल्याने सर्वांमध्ये एक प्रकारचे कौंटूबिक वातावरण तयार होते. हेच वातावरण सिनेमात देखील पाहयाला मिळत असल्याचे मत शाहरूख यांनी व्यक्त केले.