ती खेळी सचिनला समर्पित- युवराज सिंग

टी २० सामान्यात युवराज सिंगच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला होता. या विजयात सिंहाचा वाटा उचलणार्याळ युवराज सिंगने नाबाद ७७ धावांची खेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार्याा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केली.

यावेळी बोलताना युवराज सिंग म्हणाला, सध्या मी आनंदी आहे की दुःखी याबाबत निश्चिंत सांगता येणार नाही. माझ्या बॅटमधून धावा निघाल्यात यामुळे आनंदी आहे, पण दुसरीकडे सचिन तेंडुलकर लवकरच ‘रिटायर्ड’ होतो याचे दुख मला झाले आहे. सचिन महान क्रिकेटपटू असून त्याच्यासोबत खेळायला मिळाल्याचा अनुभव अद्भुत होता. आता काय बोलावे तेच सुचत नाही.

सचिन माझ्यासाठी नेहमीच ‘स्पेशल’ राहिलाय. यापुढे मला त्याच्यासोबत खेळायला मिळणार की नाही हे माहीत नाही, पण टीम इंडियामध्ये संधी नाही मिळाल्यास तो सामना स्टेडियममध्ये जाऊन बघेन, असे युवी विश्वासाने म्हणाला.

सचिन तेंडुलकरने मेहनतीच्या जोरावर प्रचंड पैसा कमवला आहे. आता बँक बॅलन्स वाढवण्याची गरज नाही. सचिनचा २०० व्या कसोटीनंतर निवृत्त होण्याचा निर्णय योग्यच आहे. आणखी एखादा दुसरे वर्ष खेळून सचिनच्या ख्यातीत वाढ होणार नव्हती. त्याचा निर्णय मला आवडला, असे स्पष्ट मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी यावेळी व्यक्त केले.