अमेरिकी फेडरल रिझर्व्हसाठी महिला अध्यक्ष

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हफच्या अध्यक्षपदासाठी जेनेट येलेन यांचे नामांकन करणार आहेत, अशी माहिती आज व्हाइट हाऊसफने दिली. जेनेट येलन सध्या फेडरल रिझर्व्हफच्या उपाध्यक्ष असून ओबामांनी नामांकन केल्यानंतर सिनेटने मान्यता दिल्यास येलेन अमेरिकेची शक्तिशाली बँक फेडरल रिझर्व्हफच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरतील. येलेन यांच्या नामांकनाबद्दल आज अमेरिकेत अधिकृत घोषणा होणार आहे. बेन बर्नांके सध्या या बँकेचे अध्यक्ष असून बर्नांके यांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीत संपत आहे. आठ वर्षांच्या कारकिर्दीत बर्नांके यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेला 1930 नंतर निर्माण झालेल्या सर्वांत भीषण आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. बर्नांके यांचा कार्यकाळ संपल्यानंतर फेडरल रिझर्व्हचे कामकाज पाहण्यासाठी ओबामांनी येलेन यांचे नामांकन केले आहे.