‘डैनियल किंग’ मध्ये झळकणार सैफ-कैटरिना

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कैटरीना कैफ यांची जोडी एकत्रित सिनेमात पाहयाला मिळाली नाही. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्या ‘डैनियल किंग’ या सिनेमासाठी डायरेक्टर कबीर खान यांनी दोघांची निवड केली आहे. त्या मुळे सैफ-कैटरिनाची ही जोडी आता सिनेमात कशी दिसणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘डैनियल किंग’ या सिनेमात सैफ अली खान गुप्‍तहेराची भूमिका करणार आहे तर अभिनेत्री कैटरीना तिच्या प्रियेसीचा रोल करणार असल्याचे समजते. हा आगामी काळात येत असलेला सिनेमा डायरेक्टर कबीर खान करीत आहे. कबीर खानने ‘डैनियल किंग’ या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली असून हा सिनेमा पुढील वर्षी १५ ऑगसत २०१४ रोजी रिलीज होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान त्याचा आगामी काळात येत असलेला कॉमेडी सिनेमा ‘हमशकल’च्या शूटिंगसाठी यूएसमध्ये व्यस्त आहे. त्याचा ‘बुलेट राजा’ हा सिनेमासुध्दा रिलीजसाठी तयार आहे. तर दुसरीकडे कैटरीनाने अमिर सोबतच्या ‘धूम-३’ या सिनेमाचे शुट संपवले असून सध्या ती रणबीर कपूर सोबत परदेशात सुटीवर गेली असल्याचे समजते. नोंव्हेबर महिन्यापासून या सिनेमाचे शुट सुरू होणार असल्याचे डायरेक्टर कबीर खानने सांगितले.