रेखा झाली आता ६० वर्षाची

अभिनेत्री रेखाच्या ‘आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं’ मात्र हिंदी सिनेमातील ही सावली सलोनी अभिनेत्री सिनेमा जगतात रूप-सौंदर्याचे आकर्षण असल्याने खूपच फेमस ठरली आहे. तिची मोहक अदा आणि मादक आवाज यामुळे तिने कित्येक दशके बॉलीवुडवर अधिराज्य गाजविले व प्रेक्षकांनी ही तिला स्वीकारले. रेखा १० आक्टोबर रोजी ५९ वर्ष पूर्ण करून ६० वर्षाची होत आहे. जेमिनी गणेशन असे तिचे नाव १० आक्टोबर १९५४ रोजी तिचा जन्म झाला. तिचे खरे नाव भानुरेखा गणेशन असे आहे. तिने १९७० साली बाल कलाकार म्हणून तेलुगू भाषेतील सिनेमा फि ‘रंगुला रत्नम’ यामधून सिनेमात पदार्पण केले. त्यांलनतर लगचेच ‘सावन भादो’ या सिनेमातून तिने बॉलीवुड मध्येश अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.

त्यांनतर मात्र रेखाला मागे वळून कधीच पहावे लागले नाही. तिचे त्यातकाळी बअनेक सिनेम हिट झाले. त्या‍मुळे तिच्याम अभिनयाचे सतत कौतुकच होत गेले. तिचे सजा, आलाप, मुकद्दर का सिकंदर, मेहंदी रंग लाएगी, रास्ते प्यार के , आशा ज्योति, सौतन की बेटी, बहूरानी, इंसाफ की देवी, मदर या सिनमातून काम करत तिने करियरची सुरूवात केली होती.

काही वेळा तिचे नाव अभिनेता नवीन निश्चल व किरण कुमार सोबत जोडले गेले. तर अभिनेता विनोद मेहरा सोबत गूपचूप विवाह केल्याचची अफवा पसरली होती. अमिताभ बच्चन सोबतच्यात रेखाच्या संबधावर आज पण चर्चा होत असते. १९८१ मधील ‘सिलसिला’ हा सिनेमा रेखा आणि जया भादुरी (बच्चन) यांच्यार प्रेम संबधावरील वास्तकव असलेला सिनेमा म्हाणून ओळखला जात होता. रेखा-अमिताभ या जोडीचा शेवटचा सिनेमा होता. त्यातनंतर दोघांनी ए‍कत्रित काम केले नाही.