चॉकलेटसाठी आवश्यक कोकोचे उत्पादन 2020 पर्यंत

लंडन – चॉकलेट निर्मितीसाठी वापरला जाणारा महत्वपूर्ण कोकोचे उत्पादन वाढत्या मागणीमुळे संपुष्टात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. इतकेच नाही, तर कोकोचे उत्पादन येत्या सात वर्षात संपुष्टात येईल, अशी शक्यताही वर्तवली असून त्याची तारीखही तज्ज्ञांनी सुचविली आहे. 2 ऑक्टोबर 2020 रोजी कोकोचे उत्पादन संपुष्टात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्याची जगातील चॉकलेटची मागणी बघता त्याप्रमाणात कोकोचे उत्पादन केले जात नाही. यात मोठी तफावत निर्माण झाली आहे आणि 2020 पर्यंत कोको उपलब्धही होणार नाही.

त्यामुळे येत्या काही वर्षांत चॉकलेटच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. जगात सध्या अपेक्षित प्रमाणात कोकोचे उत्पादन होत नसल्याचेही लक्षात आले आहे. कारण, एकदा कोकोची लागवड केली की तब्बल चार वर्षानंतर त्यातून चॉकलेट उत्पादनासाठी लागणार्या कोकोच्या बिया मिळतात. म्हणजेच शेतकर्याला यासाठी चार वर्षे वाट बघावी लागते. या कारणामुळे कोकोची लागवड करण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतोय असेही तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे कोकोच्या उत्पादनाबाबतीत येत्या काही वर्षात प्रश्नचिन्ह निर्माण होणार हे नक्की असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे