भारती आणि वॉलमार्ट भारतात स्वतंत्रपणे उतरणार

नवी दिल्ली – भारती एन्टरप्रायजेस आणि वॉलमार्ट स्टोअर्स या दोन कंपन्यांनी आज (बुधवार) आपली भागिदारी तोडण्याचा निर्णय घेत, भारतात स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची रिटेल कंपनी असलेली वॉलमार्ट कंपनी आणि भारती एन्टरप्रायझेसमध्ये असलेली 50:50 टक्क्यांची भागिदारी वॉलमार्ट आता विकत घेणार आहे. या दोन्ही कंपन्यानी भारतात स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतला घेत त्यांच्यातील रिटेल व्यवसायातील भागिदारी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या वॉलमार्टने भारती कंपनीतील काही भागीदारी खरेदी केली होती. या दोन्ही कंपन्यांनी भारतीय बाजारात संयुक्तरित्या उतरण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु आता ह्या दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे उतरणार आहेत. ही भागिदारी संपवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मंजूरी मिळाल्यानंतर वॉलमार्ट भारती वॉलमार्ट प्रायव्हेट लिमिटेडमधील भारतीची भागिदारी विकत घेईल. याबाबत बोलताना भारती एन्टरप्रायझेसचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन भारती मित्तल यांनी सांगितले की, भारती जागतिक दर्जाचे रिटेल मार्केट देण्यासाठी वचनबध्द आहे त्यामुळे भारतीची सर्व प्रकारच्या रिटेलमध्ये गुंतवणूक सुरू राहिल. सध्या 212 स्टोअर्सची संख्या आमच्याकडे असल्याने हा व्यापार वाढवण्यासाठी तसेच ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे आम्ही मानतो.