दिल्ली : केंद्र सराकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ‘बिग बॉस’ प्रसारित करणा-या चॅनेलला आणि ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. ही नोटीस काही दिवसांपूर्वीच बजावण्यात आल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सुत्रांनी दिली. बिग बॉसच्या निर्मात्याकडून किंवा टीव्ही चॅनलकडून अजून याबाबतीत काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरामुळे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ चा शो वादाच्या भोव-यात अडकला आहे.
यापूर्वी झालेल्या सहा सीझनच्या तुलनेत यावेळचा ‘बिग बॉस’ हा रिअलिटी शो सहकुंटुब पाहण्यालायक असल्याचे सांगितले जात असले तरी बिग बॉसच्या एका भागात एक कठीण टास्कचा भाग म्हणून या रिअलिटी शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना इलेक्ट्रिक करंट असलेल्या खुर्चीवर बसण्यासाठी सांगण्यात आले होते. या खुर्चीमध्ये सोडण्यात आलेला करंट हा खूपच नॉर्मल म्हणजे शॉक बसणार नाही, एवढ्याच तीव्रतेचा असल्याचे, ‘बिग बॉस’चा सूत्रधार सलमान खान यानेही जाहीर केले होते. मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या टास्कवर मंत्रालयातील काही अधिका-यांनी आक्षेप घेतला आहे.
या शोमधील स्पर्धक आपापसातील संभाषणात वापरत असलेल्या भाषेवरही आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’चे काही प्रदर्शित झालेले भागही तपासणीसाठी मंत्रालयाने मागवून घेतले असल्याचे सांगितलं जात आहे. ‘बिग बॉस’ला बजावण्यात आलेली शो कॉज नोटीस आणि स्पर्धकांच्या तोंडी असणारी भाषा याविषयी हा शो प्रसारित करणा-या चॅनेल्सकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एकंदरीत या सर्व प्रकरामुळे पुन्हा् एकदा ‘बिग बॉस ‘चा शो वसदसच्याि भोव-यात अडकला आहे.