‘देढ इश्किया’च्या पोस्टरवरून माधूरी गायब

बॉलिवूडमध्ये तिस-यांदा पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या माधुरी दीक्षित-नेनेचा ‘देढ इश्किया’ हा सिनेमा पुढील वर्षी १० जानेवारी रोजी रिलीज होत आहे. ‘देढ इश्किया’ या सिनेमाचे पोस्टे नुकतेच प्रकाशित झाले आहे. या सिनेमाच्या पोस्टरवरून मात्र अभिनेत्री माधूरी दीक्षित गायब असल्याने वेगवेगळया शंका-कुशंका व्यक्त‍ केल्या‍ जात आहेत.

‘इश्किया’ हा सिनेमा अभिनेत्री विद्या बालनने गाजवला होता. त्याचाच सिक्वल असलेल्या ‘देढ इश्किया’ या आगमी काळात येत असलेल्या सिनेमात नसीरुद्दीन शहा आणि अर्शद वारसी या जोडगोळीबरोबर माधुरी मुख्य भूमिकेत आहे. माधुरीने सध्या दोनच सिनेमे निवडले होते ते म्हणजे ‘गुलाब गँग’ आणि ‘देढ इश्किया’. मात्र, मुंबईत स्थिरस्थावर होऊन दोन वर्ष झाली तरी तिचा अजून एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.

‘गुलाब गँग’ हा सिनेमा पहिल्यापासूनच वादात सापडला आहे. आता निदान ‘देढ इश्किया’त तरी तिच्या अभिनयाची चमक पहायला मिळेल, यासाठी सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहिली जाते आहे. परंतु, या सिनेमाचे पोस्टर्स लागले असून त्यात नासिरुद्दिन आणि अर्शद हीच जोडगोळी दिसते आहे. माधुरी मात्र कुठेच पोस्टरमध्ये नाही. माधुरी या चित्रपटात बेगमच्या भूमिकेत आहे एवढेच सांगण्यात आले आहे पण, तिचा लुक कसा आहे किंवा तिच्या भूमिकेचे वैशिष्टया काय हे समजण्यास तयार नाही. त्यामुळे आगामी काळात आता तिच्या चाहत्यांना हा सिनेमा पाहवा लागणार आहे.