अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र पृथ्वी-२ची यशस्वी चाचणी

बालेश्वर – अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र पृथ्वी-२ची सोमवारी सकाळी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ३५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावरून सकाळी नऊच्या सुमारास चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्यातने संशोधकात आनंदाचे वातावरण आहे.

चंडीपूर येथील तळावरून घेण्याात आलेली ही चाचणी नियमित सराव व चाचणी मोहिमेचाच एक भाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पृथ्वी-२ हे पहिले स्वदेशी बनावटीचे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र असून ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. आगामी काळात अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र पृथ्वी-२ची उड़डाण यशस्वीक ठरल्यारस तो एक क्रांतीकारी बदल ठरणार आहे.

याआधी चंडीपूर येथूनच पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी १२ ऑगस्ट २०१३ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. आगामी काळात लवकरच यशस्वी उ़डाण घेईल अशी माहिती सू्त्रांनी दिली.