श्रुति हासन करणार अक्षय कुमार सोबत रोमान्स

बॉलीवुड अभिनेत्री श्रुति हासन निर्माता संजय लीला भंसाली यांच्या सिनेमातून आता अक्षय कुमार सोबत रोमान्स करणार आहे. आगामी काळात संजय लीला भन्साळी ‘गब्बर’ नावाचा सिनेमा करीत आहे. हा सिनेमा तमिळ सिनेमाचा रिमेकवर आधारित आहे. या सिनेमाचे दिगदर्शन दक्षिण भारतीय सिनेमाचे प्रसिदध दिगदर्शन क्रिश हे करणार आहेत.

अक्षय कुमारने यापूर्वी संजय लीला भंसाळीच्या तेलुगु भाषेतील सिनेमा ‘विक्रमाकुडु’ चा रीमेक असलेल्या. ‘राउडी राठौड’ या सिनामातून काम केले आहे. आगामी काळात येत असलेल्या ‘गब्बर’ नावाच्या. सिनेमासाठी अभिनेत्री म्हणून श्रुति हासनची निवड करण्यात आली आहे.

आगमी काळात येत असलेल्या या सिनेमात पहिल्यादाच अक्षय कुमार आणि श्रुति हासन यांची जोडी सिनेमातून काम करणार आहे. या सिनेमातून अक्षय कुमार आणि श्रुति हासनचा रोमान्स पाहिला मिळणार असल्याने या सिनेमाबाबत प्रशंसकाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पुढील महिन्यात या सिनेमाचे शुटींग सुरू होणार असून हा सिनेमा पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याचे समजते.