अभिनयच माझे पहिले प्रेम आहे. मला कमी वेळेतच बॉलीवूडमधील अनेक महत्वापूर्ण सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी खूष आहे. विवाह केल्याचा माझया कामावर काहीच फरक पडलेला नाही. त्यामूळे सध्या मी कामवर खूप खूश असल्याचे मत अभिनेत्री विद्या बालनने व्यक्त केले.
बॉलीवुडची चौथी खान म्हणून अभिनेत्री विद्या बालनची ओळख झाली आहे. तिच्या अभिनयाचे प्रशसंकाच्या् संख्येत किती तरी पटीने वाढ झाली आहे. यावेळी बोलताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, ‘काम आणि विवाह या दोन्ही गोष्टी माझयासाठी खूप महत्वाच्या होत्या. आगामी काळात मला राजकारणात जायचे नाही. त्याविषयी मला कसलेच आकर्षण नाही.’
‘द डर्टी पिक्चर’ ची डर्टी गर्ल म्हणून विद्याने मोठी लोकपियता मिळवली आहे. त्यामुळे ती पडद़याच्या पाठीमागे जाण्याचा कधीच विचार करीत नाही. तिला अभिनयात पति सिद्धार्थ रॉय-कपूरची मदत होत असल्याने गेल्या काही दिवसात तिचा अभिनय आणखी बहरला आहे. फरहान अख्तर सोबत तिचा ‘शादी के साइड इफेक्टस’ हा सिनेमा सुरू असून सध्या ती शूटिंगच्या कामात व्यस्त आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.