हृतिक-सुझानने खरेदी केला 25 कोटींचा फ्लॅट

काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान रोशन यांच्यात खटके उडाले असून लवकरच हे दोघे घटस्फोट घेणार असल्याची बातमी समोर आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जोडप्याने अलीकडेच मुंबईत एक नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. हृतिक आणि सुझानने वांद्र्या स्थित एका अपार्टमेंटमध्ये आलीशान फ्लॅट बूक केला आहे.

हृतिक-सुझानचा हा नवा आशियाना 25 कोटींची आहे. या दोघांनी सहा महिन्यांपूर्वीच नवीन फ्लॅट खरेदी करण्याची योजना आखली होती. मात्र काही कारणास्तव ते पुढे ढकलले गेले होते. सध्या या फ्लॅटचे बांधकाम सुरु असून हृतिक आणि सुझान अधूनमधून काम बघण्यासाठी येथे येत असतात. हा फ्लॅट 4500 स्के. फूटमध्ये पसरला आहे. या जोडप्याने उचललेल्या या पावलामुळे सर्व अफवांना पूर्णविराम लागला, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.