आगामी काळात आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चरित्रपट येत आहे. मोदी यांच्याी जीवनाची सुरूवात एका चहावाल्यापासून केली. त्यापने मुख्यमंत्री पदापर्यंत कसा प्रवास केला ते या सिनेमातून पहावयास मिळणार आहे. या सिनेमात गुजराती रंगभूमी आणि बॉलीवूडमध्येळ गाजलेला अभिनेता परेश रावल मोदी यांची भूमिका साकारणार आहे.
अनिवासी भारतीय मितेश पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जीवनावर आधारित सिनेमा काढायची इच्छा व्यक्त केली होती. मोदींनी गुजरातमध्ये जो बदल घडवून आणला त्यामुळे आपण प्रभावित झाल्यानेच एका चहावाल्यापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास सिनेमातून मांडावा, असा विचार त्यांच्या मनात असल्याचे पटेल यांनी सांगितले. ४० कोटी रुपये बजेटमध्ये हा सिनेमा बनवण्यात येणार आहे. मात्र, पटेल यांना मोदींची भेट घेता आली नव्हती. त्यामुळे त्यांचे काम थांबले होते. गेल्या आठवडय़ात पटेल यांनी गांधीनगरमध्ये मोदींची भेट घेतली. त्यांना सिनेमामागचा हेतू सांगितला. मोदींनी त्यांना सिनेमा काढण्यासाठी होकार दिल्यानंतर लगेचच सिनेमाचे काम सुरू करण्यात आल्याचे पटेल यांनी संगितले.
या सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका करणार कोण?, हा प्रश्न सर्वाना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून गुजराती रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात गाजलेला अभिनेता परेश रावल यांची या भूमिकेसाठी निवड झाली असल्याचे समजते. परेश रावल भूमिका करण्याबरोबरच चित्रपटाची सहनिर्मितीही करणार आहेत. मोदींच्या भूमिकेसाठी परेश रावल यांची निवड निश्चित होती. परेश रावल हे मोदींचे परिचित आहेत. परेश रावल यांनी २०१२ मध्ये गुजरात निवडणूकीसाठी मोदी यांच्या प्रचारसभेतही सहभाग घेतला होता.