चीन टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा फायनलमध्ये

बीजिंग- चीन ओपन टेनिस स्पर्धेच्या, महिला दुहेरीच्या फायनलमध्यें सानिया मिर्झा पोहचली आहे. सानीया आता झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत महिला दुहेरीच्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. दुसरीकडे राफेल नदाल आणि सेरेनाने चीन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सर्बियाची जेलेना यांकोविक आणि पेत्रा क्वितोवाने महिला एकेरीच्या अंतिम चारमधील स्थान निश्चित केले.

चीन ओपन टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा व झिम्बाब्वेची कारा ब्लॅक या जोडीने अव्वल मानांकित सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सीला ६-४, ६-४ ने पराभूत केले. सानियाच्याअ फायनल सामन्यातकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे स्पेनच्या राफेल नदालने उपांत्यपूर्व लढतीत इटलीच्या फेबियो फोगनिनीला पराभूत केले. त्याने २-६, ६-४, ६-१ अशा फरकाने सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली.

सेरेनाने कॅरोलीन वोज्नियाकीला ६-१, ६-४ ने हरवले. सर्बियाच्या जेलेना यांकोविकने चेक गणराज्यच्या लुसिई सफारोवाला ६-७, ६-४, ६-४ ने पराभूत केले. पेत्रा क्वितोवाने चीनच्या ली नाला धूळ चारली.