काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीर येथील केरन सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. शनिवारी पहाटे शालभाटी गावापासून २५ किलोमीटर अंतरावर केरन सेक्टरमधील फतेह गल्ली भागात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी सर्तक असलेल्या जवानांनी त्यांीच्याखवर हल्लां चढविला यामध्ये चार दहशहतवादी ठार झाले.

भारतीय जवानांनी हद्दीत प्रवेश करत असलेल्या या चार दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांजवळून सहा एके ४७ व शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्याव अधिका-यांनी दिली. पाक सैन्याने शाला-भाटा गावातील १४ वर्षांपासून रिकाम्या घरांवर कब्जा केला. हा भाग दहा हजार फुटांच्या उंचीवर आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीर येथील केरन सेक्टरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे लष्कराने सांगितले. गेल्या नऊ दिवसांपासून भारताची कारवाई सुरू असून आतापर्यंत १० ते १२ घुसखोरांना कंठस्नान घातले आहे. पाकने या घुसखोरीत आपल्या स्पेशल फोर्सलाही कामाला लावल्याचे भारतीय लष्कराचे म्हणणे आहे.