आगामी काळात छोठया पडद़यावर नवीन रिएलिटी शो लवकरच सुरू होत आहे. त्या शो च्या माध्यामातून बॉलीवूडची फेमस अभिनेत्री मल्लिका शेरावत झळकणार आहे. लवकरच तिचा `बॅचलरेट इंडिया.. मेरे खयालो की मलिका हा नवा रिएलिटी शो तुमच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री मल्लिका शेरावत या शोच्या माध्यमातून स्मॉल स्क्रीनवर दाखल होत आहे. राखी का स्वयंवर, राहुल दुल्हनिया ले जायेगानंतर आता मल्लिका शेरावत सज्ज झाली आहे वरसंशोधनासाठी. बॅचलरेट इंडिया- मेरे खयालो की मलिका हा इंटरनॅशनल शो येत्या ७ ऑक्टोबरपासून स्मॉल स्क्रीनवर दाखल होतो आहे.
नुकताच हा शो मान्यावरांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आला आहे.
कोन बनेगा करोडपतीमधून बिग बी अमिताभ, बिग बॉसमधून सलमान खान यांच्यापाठोपाठ आता मल्लिकाही स्मॉल स्क्रीनवर आपले नशिब आजमावणार आहे. मात्र, आता प्रत्यक्षात मल्लिकाचा हा शो प्रेक्षकांना भावणार का? हे पाहण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.