नवी दिल्लीक- जम्मू आणि काश्मिरमधील केरन सेक्टीरमध्ये कोणीही घुसखोरी केली नसून, सीमारेषेजवळ केला जात असलेल्याम घुसखोरीचा प्रयत्ना भारतीय जवानांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्याज चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवानांनी यमसदनी धाडले असल्याची माहिती सैन्यप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
जम्मू काश्मीरमध्ये कारगिलची पुनरावृत्ती होत असल्याचे माध्यंमांकडून सांगितले जात होते. त्यावर विक्रमसिंग यांनी शुक्रवारी स्पष्टीपकरण दिले. यावेळी बोलताना विक्रमसिंग म्हणाले, ‘त्याठिकाणी घुसखोरीची कोणतीही परिस्थिती नाही. कोणत्याही गावाचा ताबा दहशतवाद्यांनी घेतलेला नाही. दहशतवादी काही ठिकाणी लपून बसले आहेत. त्यांच्याविरुद्ध मोहीम सुरु आहे. त्यांना हुसकून लावण्यात येईल. पाक सैन्याने शाला-भाटा गावातील १४ वर्षांपासून रिकाम्या घरांवर कब्जा केला. हा भाग दहा हजार फुटांच्या उंचीवर आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे बुधवारी लष्कराने सांगितले. गेल्या नऊ दिवसांपासून भारताची कारवाई सुरू असून आतापर्यंत १० ते १२ घुसखोरांना कंठस्नान घातले आहे.’ पाकने या घुसखोरीत आपल्या स्पेशल फोर्सलाही कामाला लावल्याचे भारतीय लष्कराचे म्हणणे आहे.