रणबीरच्या ‘बेशरम’ची पहिल्याच दिवशी २१ कोटी कमाई

मुंबई: बॉलीवूडचा फेमस अभिनेता रणबीर कपूर याच्या बहूचर्चीत ‘बेशरम’ सिनेमाने बॉक्स ऑपिफसवर पहिल्याच दिवशी २१.५६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अभिनव सिंह कश्यपच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बेशरम’पासून दूर राहा असं समीक्षकांनी प्रेक्षकांना सांगितलं होते. पण समीक्षकांच्या टीकेनंतरही प्रेक्षकांवरही त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. पहिल्यादच दिवशी सिनेमा फुल्लय झाल्या ने आगमी आठ दिवसातच बेशरम’ सिनेमा १०० कोटीच्या घरात जाईल असे वाटते.

हिमांशु मेहरा, संजीव गुप्ता आणि रिलायन्स एंटरटेनन्मेंट यांनी संयुक्तरित्या बेशरम’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ६० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. तर सिनेमाच्या प्रोमोशन आणि जाहिरातीसाठी आणखी १० कोटी रूपये खर्च आला आहे. त्याेमुळे हा सिनेमा आगामी काळात किती कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी बुधवारी हा सिनेमा देशात ३६०० थिएटर आणि परदेशातील ७०० थिएटरमध्ये एकाच वेळी रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आपले वडील ऋषी कपूर आणि आई नितू कपूर यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. त्याेमुळे हा सिनेमा आगामी काळात हिट होईल असे दिसते.