बेशरम सिनेमाच्याश प्रमोशनसाठी रणबीर कपूर व अभिनव कश्यप या जोडीने नवा मार्केटिंग फंडा शोधून काढला आहे. ‘बेशरम’ सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी ज्या-ज्या गोष्टी बेशरमपणाच्या यादीच मोडतात त्या त्या गोष्टी करायचा असा चंगच रणबीर आणि त्याचा दिग्दर्शक अभिनव कश्यप या दोघांनीही बांधला आहे. आगामी काळात ‘कामसूत्रा’च्या या बिहारमधील मूळ शहरात जाऊन ‘बेशरम’चे काही कनेक्शन त्याच्याशी जोडता येते का?, याचा प्रयत्न आता हे दोघेजण करणार आहेत.
जगभर प्रसिध्द असणारे ‘कामसूत्र’ बिहारमध्ये, तेही पाटण्यात लिहिले गेले अशी माहिती रणबीरला आणि अभिनवला मिळाली. तेव्हा ‘कामसूत्रा’च्या या मूळ शहरात जाऊन ‘बेशरम’चे काही कनेक्शन त्याच्याशी जोडता येते का?, याचा प्रयत्न ते दोघे करणार आहेत.
दुबईत ‘बेशरम’ चित्रपटाची झलक दाखवतानाच रणबीरला अफलातून प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानेही खुल्लमखुल्ला उत्तरे दिली. ‘बेशरम’मध्ये तुला सगळ्यात काय अवघड गोष्ट करावी लागली?, या प्रश्नावर त्याने मला छातीवरचे केस वाढवावे लागले हे उत्तर देताच एकच हशा पिकला. अर्थात, हा एक नव्हे असे अनेक ‘बेशरम’ संवादही या सिनेमात आहेत.
‘कामसूत्र’ बद्दल भरपूर ऐकीव माहिती असलेल्या या जोडगोळीला वात्स्यायन ऋषीनी बिहारमध्ये कामसूत्र लिहिले होते, ही माहिती नव्याने मिळाली. कामसूत्रचे हे बिहार कनेक्शन ऐकून दोघांचेही डोळे चमकले. लैंगिकता हा आपल्याकडे अजूनही खुल्लमखुल्ला न बोलला जाणारा विषय. त्यामुळे या विषयावरचा ग्रंथ जिथे रचला गेला तिथे जाऊन ‘बेशरम’ सिनेमाच्यार प्रसिध्दी करण्याचा या दोघांचाही विचार आहे.अभिनव कश्यपचा पहिलाच ‘दबंग’ हा चित्रपट यशस्वी झाला होता. त्यामुळे ‘दबंग’ आणि ‘बेशरम’ मध्ये नेमका काय फरक आहे असे वाटते हा प्रश्न विचारल्यावर ‘दबंग’ चा नायक निर्भय होता. ‘बेशरम’चा नायक निर्लज्ज आहे असे उत्तर रणबीरने दिले.