लहान मुलांवर संस्काराचे वाङमय अपुरे पडत आहे ˆ नागनाथ कोतापल्ले

पुणे, – लहान मुलांसाठी लिहीले गेलेले साहित्य हे समाधानकारक नाही. मुलांवर संस्कार करणारे वाड्.मय कमी पडत आहे. जग खुले झाले आहे. त्यामुळे मुलांपर्यंत नको त्या गोष्टीही पोहोचत आहेत. बदललेला मुलगा, निसर्गाचे व्यापकपण या गोष्टी लक्षात घेऊन बालकुमार साहित्यिकांनी लिखाण केले पाहिजे. हे लक्षात घेऊन लिखाण केले तर, वाचकसं‘याही वाढेल. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

साधना ट्रस्टच्या बालकुमार दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झले यावेळी ते बोलत होते. ज्येष्ट समीक्षक प्रा. रा.ग. जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, साहित्यिक भारत सासणे आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यावेळी उपस्थित होते. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, मराठीतील बालवाड्.मय हे एकाच परिवर्तनात अडकत चालले आहे. मुलांना अद्भूत गोष्टी आवडतातच परंतु त्यातून राक्षस, परी या पात्रांचीच निर्मिती होत आहेे. त्यातून सुचित होणारा दृष्टिकोन आजच्या काळाला न शोभणारा आहे असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अवचट म्हणाले, बालवाड्.मय हे आतून आले पाहिजे. ते गरज म्हणून लिहीले तर ते साहित्य जिवंत राहणार नाही. आतून ते साहित्य आले तर, ते जास्त चांगले होईल. एकमेकांना सामावून घेणारे साहित्य पाहिजे. सिनेमा, व्हिडीओ याचा दुष्परिणाम आज मुलांवर होत आहे. बाल साधना ही सरळ विचार करणारी, सर्वांना सामावून घेणारी असली पाहिजे. मुलांशी आपले मोठेपण विसरुन त्यांच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत. मुलांना त्यांच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे. शाळा ही मर्यादित गोष्ट असून त्याच्या बाहेरही मोठे जग आह.े ज्यांचे मन बालसदृश आहे तेच बालसाहित्य लिहू शकतात.
————————————