पुणे , : फोर्जिंग आणि मशीन यंत्रे निर्मितीत देशात आघाडीवर असलेली कल्याणी फोर्ज लिमिटेड कंपनी राज्याच्या ग्रामीण भागातील दुर्लक्षित गटातील महिलांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेत असून पुण्याजवळ सनसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे प्रकल्प अत्यधुनिक करण्यास तसेच क्षमता वाढीसाठी २ ० ० कोटी रुपये गुंतवणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक रोहिणी कल्याणी आणि कार्यकारी संचालक विराज कल्याणीयांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले .
कल्याणी कुटुंबाची तिसरी पिढी यानिमिताने उद्योगात पुढाकार घेत असून कृषी, रेल्वे, उर्जा , बांधकाम सागरी उद्योग आणि सेवा या क्षेत्रात जोमाने पुढे जाण्याची योजना यावेळी जाहीर करण्यात आली. २ ३ वर्षाच्या विराज यांनी व्हार्टन स्कूलमधून अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अशी दुहेरी पदवी संपादन केली आहे. फोर्जिंगमधील पितामह म्हणून ओळखले जाणारे आजोबा नीलकंठराव कल्याणी यांनी उभा केलेला उद्योगाचा डोलारा आणखी विस्तारण्याची मनीषा यावेळी दोघांनी बोलून दाखविली. सध्या कल्याणी फोर्जमध्ये १ २ ० ० कर्मचारी आहेत . रॉड , फोर्क कॅमशाफ्ट अशी अनेक उत्पादने कंपनी बनवते.
एकूण उत्पादनापैकी २ ५ टक्के निर्यात होत असून त्यात वाढ केली जाणार आहे अशी माहिती देऊन विराज म्हणाले की सध्या असलेली टनेज क्षमता टप्प्याटप्प्याने ६ ५ ० वरून चार हजार केली जाणार आहे . कारण तशी मागणी आम्हाला युरोप आणि अमेरिकेतून येते आहे. मंदी असल्याने वाहन उद्योगावर असलेले अवलंबित्व आम्ही कमी करत आहोत . डेमलर , महिंद्र सारखे आमचे ग्राहक आहेत आणि येत्या काळात स्थिती सुधारेल असा आमचा विश्वास आहे. अधिक नफा मिळवल्यास त्यातील वाटा कामगारांना देण्याचे तत्व अमलात आणणार आहोत .
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन शॉप फ्लोअरवर समाविष्ट केले जात असून सध्या अशा २ ५ महिला काम करत आहेत अशी माहिती देऊन रोहिणी कल्याणी म्हणाल्या की समाजाच्या दुर्लक्षित गटातील तरुण मुलीना संधी मिळावी यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन सबळ बनवत आहोत. त्यासाठी शिक्षण आणि तंत्रशिक्षण संस्थांशी बोलणी सुरु आहेत. कॅम्पसनिवड केली जाते आहे .
जून १ ३ अखेर कंपनीचा व्यवसाय ८ . ५ ४ टक्के वाढला आहे.