गोलंदाजामुळेच सामना जिंकता आला- द्रवीड

जयपूर-चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० मधील सामन्यात पर्थ स्कॉर्चसचा राजस्थान रॉयल्सने सहज पराभव केला. या विजयाचे श्रेय कर्णधार राहुल द्रविडने संघाच्या गोलंदाजांना दिले आहे. त्यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या मदतीमुळेच हा सामना जिंकता आल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सामना जिंकल्यांनतर बोलताना राहुल म्हणाला, ‘जिंकणे सर्वांना आवडते. त्यात उत्तम कामगिरी करुन विजय मिळविणे यातून संघाची खेळी उंचावते. त्यामुळे पुढील प्रत्येक सामन्यात याहूनही चांगली कामगिरी करण्यावर संघाचा भर असेल आणि सामन्यातून आम्हाला समाधान मिळेल याच्याच प्रयत्नात आम्ही खेळू.’

गोलंदाजांनी सामन्यात उत्तम कामगिरी केली. जिमी आणि कूप्सने भेदक मारा केला. तसेच फलंदाजीतही सॅमसन, रहाणेने चांगली फलंदाजी केली असेही द्रविडने स्पष्ट केले.

पर्थ स्कॉर्चर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने उत्तम कामगिरी करुन नऊ विकेट्सने विजय मिळविला. सामन्याच्या सुरुवातीला भेदक गोलंदाजीकरत रॉयल्सने प्रतिस्पर्धीसंघाला १२० धावांत रोखले. त्यानंतर याधावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा केवळ एक गडी बाद झाला आणि लक्ष्य १७व्या षटकात गाठले.