लातूर-उस्मानाबादमधील भूंकपाला २० वर्षे पूर्ण

उस्मानाबाद: लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूंकपाला सोमवारी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर काळात महाराष्ट्रात आलेली सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून या भूकंपाचा उल्लेख केला जातो. या भूकंपाच्या धक्याने दोन्ही जिल्ह्यातील ७ हजार ९२८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले.

३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर जिल्ह्यातील किल्लारी भागात होता. ६.४ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपाने या भागातील नागरिकांचे जीवनच बदलवून टाकले. या भूंकपात दोन्ही् जिल्ह़भयातील मिळून ३० गावे भूईसपाट झाली होती. तर ७ हजार ९२८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

या दोन्ही जिल्ह्यात भूकंपानंतर हजारो घरे बांधून जगातले सर्वात मोठे पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्यात आले होते. या घटनेला जरी वीस वर्षांचा काळ लोटला असला तरी ही घटना दोन-तीन वर्षापूर्वी घडली असावी असे येथील नागरिकांना या भयावह घटनेमुळे वाटते. या भागातले नागरिक या धकयामधून अजून पूर्णपणे सावरले नाहीत. आजही ते या घटनेच्या आठवणीमुळे ते व्यतीत होतात.